औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 341 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद, दि.03   : औरंगाबाद जिल्ह्यात आज 328 जणांना (मनपा 156, ग्रामीण 172) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 11229 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 341 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14894 झाली आहे. आजपर्यंत एकूण 487 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3178 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
दुपारनंतर 250 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 59, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 71 आणि ग्रामीण भागात 70 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
 आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे  (कंसात रुग्ण संख्या) आहे.
*ग्रामीण (79)*
औरंगाबाद (6), फुलंब्री (3), गंगापूर (18), खुलताबाद (7), सिल्लोड (6), वैजापूर (22), पैठण (9)
प्रशांत नगर, सिल्लोड (1), त्र्यंबक चौक, बजाज नगर (1), खदगाव (1), जरंडी, सोयगाव (1),  आडगाव, फुलंब्री (1), शिव नगर, कन्नड (1), भांबरवाडी, कन्नड (1), नेहरु चौक, पैठण (1)
*सिटी एंट्री पॉइंट (59)*
गंगापूर (2), हर्सूल (1), छावणी (1), गारखेडा परिसर (2), एन सात (2), गरम पाणी (3), बौद्धवाडा, चिकलठाणा (2), भवानी नगर, वाळूज (2),  लक्ष्मी अग्नी कंपनी वाळूज (13), पोरगांव (1), गारखेडा (1), बौद्ध नगर (1), अबरार कॉलनी (1), शहा नगर (1), जवाहर नगर पो. स्टे मागे (1), संत ज्ञानेश्वर नगर (1), नवजीवन कॉलनी (1), चितेगाव (1), खोजेवाडी, गंगापूर (2), जेऊर, कन्नड (1), सासेगाव (1), सिल्क मिल्क कॉलनी (1), शेंद्रा (3), छत्रपती नगर (2), कामगार कॉलनी (1), म्हाडा कॉलनी (1), एन सहा (2), कन्नड (1), पिंपरी राजा (1), वाळूज (1), सातारा परिसर (1), शिवाजी नगर (4)
*मनपा (41)*
विशाल नगर (1), उल्कानगरी (1), जवाहर कॉलनी (6), बन्सीलाल नगर (2), बाजीप्रभू चौक, गजानन नगर (1), सुराणा नगर (1), वेदांत नगर (4),  सिडको (1),  मयूर नगर, हडको (1),  स्वामी विवेकानंद नगर, हडको (1), राहुल नगर (1), विष्णू नगर (1),  आदर्श कॉलनी  (2), सरस्वती कॉलनी (1), पांडुरंग नगर (1), मुकुंदवाडी (1), अन्य (6), जालन नगर (1), एनआरएच (1), बेगमपुरा (1),एन सात, सिडको (1), मिल कॉर्नर (2), स्वामी विवेकानंद नगर (1), मोमिनपुरा (2) 
*कोरोनाबाधित स्त्रीचा मृत्यू*
घाटीत रामनसपु-यातील 45 वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
*****

Post a comment

0 Comments