औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 377 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर


औरंगाबाद, : औरंगाबाद जिल्ह्यात आज 186 जणांना (मनपा 74, ग्रामीण 112) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 12146 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 377 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16490 झाली आहे. आजपर्यंत एकूण 535 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3809 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
सकाळनंतर 247 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 66, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 42 आणि ग्रामीण भागात 124 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
*ग्रामीण (130)* 
काझी मोहल्ला, कन्नड (1), रांजणगाव (1), औरंगाबाद (18), फुलंब्री (15), गंगापूर (40), कन्नड (24), सिल्लोड (16), पैठण (13), पिंपळगाव, फुलंब्री (1),चित्तेपिंपळगाव (1)
सिटी एंट्री पॉइंट (66)
रांजणगाव (1), चिकलठाणा (1), एन चार (1), वाळूज (2), सावित्री नगर (1), रमा नगर (1), पद्मपुरा (4), जाधववाडी (1), शिवाजी नगर (1), हर्सूल (2), घृष्णेश्वर (1), बजाज नगर (6), कांचनवाडी (1), मिटमिटा (2), श्रेय नगर (4), टाकळी ,खुलताबाद (1), कडेठाण, पैठण (1), गुरूदत्त नगर (1), मयूर पार्क (2), पवन नगर (2), जोगेश्वरी (1), वडगाव (1), बीड बायपास (2),  सातारा परिसर (2),  कांचनवाडी (5), नक्षत्र पार्क (2), देवळाई (3), जालन नगर (1), चितेगाव (1), कोकणवाडी (1), ढोरकीन (1),  चिकलठाणा (4), मुकुंदवाडी (1), पडेगाव (3), अन्य (2)
*मनपा (09)*
माजी सैनिक कॉलनी, पडेगाव (1), उल्कानगरी, गारखेडा परिसर (1), बीड बायपास (1), सिडको (1), उस्मानपुरा (1),एमजीएम निवासी वसतीगृह परिसर (1),  राज पार्क कॉलनी,हिना नगर (1), बन्सीलाल नगर (1), अन्य (1) 
*नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू* 
घाटीत रांजणगाव, शेणपूजीतील 60 व 72, पद्मपुऱ्यातील लालमन कॉलनीतील 71, बिल्डा,फुलंब्रीतील 71, लोणी (खु.) 78 वर्षीय पुरूष आणि छावणीतील 73,गंगापूर तालुक्यातील सावखेड्यातील 70 वर्षीय महिला तर खासगी रुग्णालयात  अजिंठा, सिल्लोड येथील 63, देवगाव रंगारीतील 72 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

Post a comment

0 Comments