सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिसांची माणुसकी कोरोना बाधिताच्या उपचारासाठी 50 हजाराची मदत
सिल्लोड- (अजय बाेराडे ),एका सेवानिवृत्त सहायक फौसदाराजवळ कोरोना बाधित मुलाच्या उपचारासाठी वेळेवर पैसे नसल्याने सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहकारी सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे व सहकारी पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या सहकारी पोलिसांनी 50 हजाराची मदत केली असून पोलिस कल्याण निधीतून ही अडीच लाख रुपयांची रक्कम तातपुर्त्या स्वरुपात देण्यात आली आहे. 

    कुणावर कधी कसा प्रसंग येईल सांगता येत नाही. असाच प्रसंग एका सेवानिवृत्त सहायक फोसदारावर आला आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला हे पोलिस कर्मचारी 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. यामुळे सेवानिवृत्ती नंतर मिळणाऱ्या पैश्याला अवधी असतांना मुलाला कोरोनाची लागन झाली व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारासाठी पैसे नसल्याने हा पोलिस कर्मचारी हतबल झाला. कमी वेळेत उपचारासाठी मोठी रक्कम आणावी कोठुण असा प्रश्न पडला. अशात त्यांनी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना भेटून ही बाब निदर्शनास आणून दिली व मदत मिळावी म्हणून पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) यांच्याकडे मागणी केली.

      तोपर्यंत ही माहिती ग्रामीण ठाण्यातील आपल्या सहकारी पोलिसांना ही मिळाली होती. सहकारी पोलिस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने 50 हजारांची मदत केली. दरम्यान या सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याला पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) विवेक सराफ यांच्या आदेशानंतर तत्काळ पोलिस कल्याण निधीतून अडीच लाख रुपयांची रक्कम तातपुर्त्या स्वरुपात देण्यात आली आहे. 

*चौवीस तासात मिळाली मदत*

   या सेवानिवृत्त सहायक फोसदाराने 20 ऑगस्ट रोजी  पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. त्यांनी गांभीर्य लक्षात घेत 21 ऑगस्ट रोजीच पोलिस कल्याण निधीतून अडीच लाख रुयये देण्याचे आदेशीत केले. तातपुर्त्या स्वरुपात देण्यात आलेले अडीच लाख रुपये त्यांच्या सेवानिवृतीनंतर मिळणाऱ्या रजा रोखीकरणाच्या रकमेतून वसूल करण्यात यावी असे ही आदेशात म्हटले आहे.

Post a comment

0 Comments