औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 64 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18853 वर


औरंगाबाद, दिनांक 17 :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 333 जणांना (मनपा 172, ग्रामीण 161) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 14217 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 64 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18853 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 595 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4041 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 52 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये  अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर एक, ग्रामीण भागात 14 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.
*ग्रामीण (38)*
पळशी, सोयगाव (1),अजिंठा (1), साजापूर, बजाज नगर (1), सलामपूर, वडगाव (1), सिडको, म्हाडा, बजाज नगर (3),  बजाज नगर (1),  स्वामी समर्थ, बजाज नगर (1), इंदिरा नगर, पंढरपूर (2), सरस्वती सो., बजाज नगर (1), कायगाव, गंगापूर (1), बाबाजी मंदिर, बोरसर (1), हनुमान नगर, अजिंठा (5), परदेशी गल्ली, वैजापूर (2), कुलकर्णी गल्ली, वैजापूर (1), शांती नगर, वैजापूर (1), पाचीपीरवाडी (1), औरंगाबाद (6), फुलंब्री (1), गंगापूर (2), कन्नड (1),सिल्लोड (1), पैठण (3)
*मनपा (13)*
घाटी परिसर (3), मिटमिटा, पडेगाव (1), फुले नगर, उस्मानपुरा (1), दशमेश नगर (1),  अन्य (1), महा कॉलनी (1), शिवाजी नगर (1), पडेगाव नगर (3), बालकृष्ण नगर (1)
*सिटी एंट्री पॉइंट (1)*
गजानन नगर, गारखेडा (1)
*सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू*
घाटीत वाळूजच्या समता नगरातील 03 वर्षीय मुलगा, एन तेरा हडकोतील 49, दीप नगर, एन अकरातील 46, जटवाडा, हर्सुल येथील 70, कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रातील 71 वर्षीय पुरूष आणि फुलंब्रीच्या महारसावलीतील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
*****

Post a comment

0 Comments