वडोद बाजार च्या स.भु. विद्यालयाचा दहावी चा निकाल 88 टक्के


 फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)

फुलंब्री - तालुक्यातील वडोद बाजार येथील श्री सरस्वती भुवन विद्यालयाचा यंदा दहावी च्या परीक्षेचा निकाल  88.67 टक्के एवढा लागला असून विद्यालयाने याही वर्षी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
श्री स.भु.विद्यालयात कु.साक्षी पांडुरंग वाघ हिने 87.60 टक्के गुण घेऊन सर्व प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यशोदा चंद्रभान ब्राम्हणे व समरीन अन्सार खान यांनी  86.60 टक्के गुण घेऊन दोन्ही विद्यार्थ्यांनी द्वितीय आल्या आहे .तसेच तृतीय क्रमांक जयश्री विष्णु सोमदे हिने 85.20 टक्के गुण प्राप्त केले आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शालेय समिती अध्यक्ष  अमोल भाले , व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश पाडेजी ,मुख्याध्यापक अशोक भारती  , महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे सुधाकर कापरे,  वरिष्ठ लिपिक डि.डी.दुबे ,एन.वाय.वाघ प्रा.बी.सी.पाटील ,याच्या सह माजी जि.प.सदस्य शिवराम म्हस्के, पांडुरंग पाटील वाघ, गोविंद पाडेजी, डॉ.गोपाल वाघ, मधुकर म्हस्के, दीपक ताबंट, भागीनाथ घुले आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a comment

0 Comments