निलेश जांबले दौंड-
पुणे
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील वरवंड येथील केतन भापकर याची दौंड तालुका मराठा सेवा संघाच्या सोशल मीडिया सेलच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे...
केतन भापकर यांनी आंतराष्ट्रीय खेळाङु (वुङबाॅल) मध्ये विशिष्ट कामगिरी करतात स्वताच्या नावासोबत महाविद्यालय व तालुक्याचे नाव संपुर्ण देशात पोहचवण्याचे काम स्वताच्या कौशल्याने केले आहे....
2019साली युगांडा व केनिया देशात झालेल्या 2nd बिच वुङबाॅल वर्ल्ङकप स्पर्धेत चमकदार कामगिरी करत.... नेटबाॅल, काॅर्फबाॅल, खो-खो खेळात खेळाङु म्हणून प्रतिनिधित्व केले आहे...
महाविद्यालयातील जिवनापासुन राष्ट्रीय सेवा संघाच्या माध्यमातुन समाजकार्यास सुरवात करण्याचा प्रयत्न केतन भापकर याचा होता... शिवजयंती, गणेशोत्सवाच्या माध्यमातुन समाजकार्य करण्याचा छोटासा प्रयत्न त्याने केलेला आहे.... तदनंतर खेळाचा प्रसार व्हावा व सामान्य कुटुंबातील मुलांना खेळाचे योग्य प्रशिक्षण मोफत मिळावे यासाठी शिवछत्रपती स्पोर्ट्स क्लबची स्थापना केलेली असून हेच सामाजिक काम समाजाबाबतची तळमळ पाहून दौंड तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष समीर मोहिते यांनी त्याच्या या कामाची दखल घेत दौंड तालुका मराठा सेवा संघाच्या सोशल मीडिया सेलच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र दिले आहे...
0 Comments