भाजपच्या वतीने फुलंब्री येथे चक्का जाम आंदोलन


 *फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)* 

फुलंब्री तालुक्या मध्ये आज दिनांक 1 ऑगस्ट या दिवशी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. गायीच्या दुधाला सरसकट १० रु. लिटर प्रमाणे अनुदान मिळावे व दुध पावडरला प्रती किलो ५० रु.अनुदानाच्या मागणी करिता आज रोजी महायुतीच्या वतीने संपूर्ण राज्यात आंदोलन करण्याचा निर्णय प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आला असून , प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते मा.देवेंद्र फडवणीस , केंद्रीय मंत्री मा रावसाहेब पाटील दानवे, मा.विधानसभा अध्यक्ष मा हरिभाऊ बागडे नाना  यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारल्या जाणारा कर्ज पुरवठा,नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतकऱ्यांचे वादळामुळे झालेले नुकसान,अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही.या संकटाच्या माळेमध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये १५० लाख लिटर गायीचे दुध उत्पादित होते.त्यापैकी ३० लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केल्या जाते. ९० लाख लिटर दुध खाजगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतल्या जाते. ३० लाख लिटर दुध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. शासकीय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दुध खरेदी केले जाते.

या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दुधाचा विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध २० ते २२ रु. दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती.परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केल्या जात आहे.  गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो ५० रु अनुदान, शासनाकडून ३० रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी या न्याय्य मागण्याकरिता आज १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुध संकलन बंद आंदोलन करण्यात आले आहे.तसेच भारतीय जनता पार्टी फुलंब्री तालुक्याच्या वतीने आज सकाळी 10:30 वा महात्मा फुले चोक फ़ुलंब्री येथे रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी करण्यात आले व यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष विजय औताडे, भाजपा तालुका अध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुहास शिरसाठ ,जि प सभापती अनुराधा चव्हाण, जि प सदस्य शिवाजी महाराज, पाथ्रिकर जि प सदस्य जितेंद्र बाबा जयस्वाल, सभापती सविता फुके, तारू आप्पा मेटे, राजेंद्र काळे, राजू डकले, माजी सभापती सर्जेराव मेटे,प स सदस्य कैलास सोनवणे, नाथ आप्पा काकडे, उपसभापती संजय त्रिभुवन एकनाथ धटिंग, रोशन असरमल, राजू भाऊ तुपे, हौसाबाई काटकर मंगलाताई वाहेगावकर, ऐश्वर्या गाडेकर, सोनाली सोनवणे, आबासाहेब फुके, नरेंद्र देशमुख, मयूर कोलते, सुदाम पवार, टाकळी सरपंच विजय आहेर, साईनाथ श्रीखंडे, अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष सोमीनाथ भालेराव, रामेश्वर चोपडे, सुचित बोरसे, मनोहर सोनवणे, विलास उबाळे, शार्दुल काळे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश मिसाळ, उपनगराध्यक्ष गजानन नागरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष राम बनसोड, भाजपा शहराध्यक्ष सुमित प्रधान, नगरसेवक गणेश राऊत, माजी सभापती अजय शेरकर, सभापती वाल्मिक जाधव, नगरसेवक शेखर पालकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments