आई रागावल्याचा राग मनात धरून मुलीची गळफास घेऊन आत्महत्याऔरंगाबाद : दहावी शिक्षण घेत असलेल्या मुलीला आईने अभ्यास करण्याच्या कारणावरून रागावल्याचा राग मनात धरून मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भावसिंगपुरा येथे घडली.

हर्षदा किशोर लोखंडे (वय -16 रा. भावसिंग पुरा) असे मुलीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी हर्षदाला आईने दहावीचं वर्ष असल्याकारणामुळे अभ्यास करण्याचे सांगितले. दरम्यान आई स्वतःच्या दुकानात गेली असता आई रागावण्याचा राग मनात धरून हर्षदाने दुपारी चारच्या सुमारास गळफास घेतला.

काही वेळानंतर आई घरी आल्यानंतर हर्षदाने गळफास घेतल्याचे लक्षात आले. आईने आरडाओरड केली असता शेजाऱ्यांनी तात्काळ मुलीला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Post a comment

0 Comments