आधीच्या मंत्र्यांनी काय केले हे मला नका विचारू ; मी तर आत्ता दीड वर्ष झाली आले ; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडऔरंगाबाद - राज्यातील शाळांना अनुदान दिले नाही मात्र ५८ शिक्षकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता त्या म्हणाल्या की, मी तर आत्ता दीड वर्षे झाली आले आणि त्यातच प्रारंभी कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात निर्माण झाला. आधीच्या सरकारमधील मंत्र्यांनी काय केले. हे मला नका विचारू आधीच्या मंत्र्यांना तुम्ही हे प्रश्न विचारा असे म्हणत शिक्षण विभागातील विविध प्रश्नांवर शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी बोलण्याचे टाळले. शिक्षकांचे अनेक प्रश्न मला माहित आहेत त्यामुळे आगामी काळात त्यावर सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असे म्हणत शालेय शिक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. 

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील विविध प्रश्न जाणून घेत शिक्षक तसेच संस्था चालकांच्या अडचणी जाणून घेतल्या. शालेय शिक्षण मंत्र्यांवर यावेळी प्रश्न तसेच निवेदनांचा अक्षरशः पाऊस पडला. कोरोनाच्या काळात शिक्षण विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, मात्र तरीही प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी हे राज्य सरकार सकारात्मक विचार करून काम करत असल्याचा विश्वास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, इब्राहिम पठाण, माजी शहराध्यक्ष नामदेवराव पवार, रवींद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे कमाल फारुकी, काँग्रेस महिला शहराध्यक्षा सरोज मसलगे, ऍड. सय्यद अक्रम, माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप, पवन डोंगरे, आदींची उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments