बकोरीचे डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात केले प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन.


निलेश जांबले दौंड-पुणे
    अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे निमित्ताने संपूर्ण देशात वेगवेगळ्या पद्धतीने पुजा -अर्चा होम हवन चालू आहे .त्यामुळे माहिती सेवा समिती ,दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान,शिवप्रतिष्ठान वाघोली यांचे माध्यमातून बकोरीचे डोंगरावर पिंपळाचे देवरुपी झाडाखाली प्रभू रामचंद्र यांची प्रतिमा ठेऊन ,रांगोळी काढून पुजा करण्यात आली खर्याअर्थाने आम्ही रोजच प्रत्येक झाडातच प्रभू रामचंद्र यांना पाहत असतो त्यामुळे त्याठीकानी आजचे शुभ मुहूर्तावर पुजा करण्याचे ठरले व त्याप्रमाणे आज करोनाचे पार्श्वभूमीवर मोजक्याच कार्यकर्त्यांचे समवेत पुजा केली व पुढील काळात ५ लाख वृक्षलागवड करण्यासाठी आम्हाला शक्ती देण्यासाठी प्रभूरामचंद्राना साकडे घातले .व त्यांचे आशीर्वादाने पुढिल काही वर्षांत नक्कीच आम्ही सर्वजण ५ लाख झाडे लावण्यात यशस्वी होऊ असा विश्वास आम्हाला असल्याचे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी सांगितले .सदर कार्यक्रमासाठी गणेश जाधव ,चैतन्य पवार, धनश्री वारघडे ,धणराज वारघडे ,चंद्रकांत वारघडे ,नवनाथ शितकल हे ऊपस्तीत होते .धनश्री वारघडे यांनी छानशी रांगोळी काढली व चैतन्य पवार यांनी नारळ फोडून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a comment

0 Comments