दुधाला एकच भाव देण्याची अखिल भारतीय क्रांतीसेने ची मागणी


पैठण प्रतिनिधी.विजय खडसन:--
आज संपूर्ण भारतात दूध दरवाढी बाबत आंदोलन सुरु आहेत. त्या अनुशंगाने अखिल भारतीय क्रांती सेनेचे पक्षाध्यक्ष मा. संतोष तांबे पाटील यांनी दुधाला महाराष्ट्रा सहित संपूर्ण भारतात एकच दर मिळावा अशी मागणी (NDDB) नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड चे चेअरमन श्री. दिलीप राठ आणि (NCDFI) नॅशनल को-ऑपरेटीव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया चे चेअरमन मंगल जीत राय यांच्या कडे केली आहे.
 या मध्ये महाराष्ट्रातच आपल्याला दुधाच्या भावामध्ये फरक दिसेल जसे कि सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात (३.५ FAT, SNF ८.५) २१ते २५ रु. प्रती लिटर भाव मिळतो तर त्याच प्रकारच्या दुधाला अहमदनगर, औरंगाबाद, सोलापुरच्या शेतकऱ्यांना १६ ते २० रु. प्रती लिटर भाव दिला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात जेव्हा तेच दुध पिशवी मध्ये विक्रीस येते तेव्हा त्याच दुधाची किंमत ४५ रु. प्रती लिटर अशी मोजावी लागते. समान कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची पिळवणूक आणि शोषण थांबले पाहिजे, असेही निवेदनात म्हटले आहे. दुध संघ, दुध संकलन केंद्र सस्वतःच्या मार्जीने जे भाव ठरवतात त्यावर (NDDB) नॅशनल डेअरी डेवलपमेंट बोर्ड चे चेअरमन श्री. दिलीप राठ आणि (NCDFI) नॅशनल को-ऑपरेटीव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया चे चेअरमन श्री. मंगल जीत राय यांनी लक्ष देऊन संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात दुधाला एकच हमीभाव देण्याची मागणी अखिल भारतीय क्रांती सेना पक्षाच्या वतीने करण्यात आली.

Post a comment

0 Comments