मुंबई प्रतिनिधी :अज्ञात व्यक्तीद्वारे सोशल माध्यमावर खोडसाळपणे केलेल्या बदनामीकारक एस एम एस च्या बाबतीत अबुदय बँकेकडून जनतेला स्पष्टीकरण
परळ येथील मुख्यालायात अभूदय बँकेचे चेअरमन संदीप घनदाट यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अभुदय को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या प्रतिष्ठित बँकेच्या विरोधात काही अज्ञात व्यक्तीं द्वारे बदनामीकारक एस एम एस सोशल माध्यमाद्वारे पसरविण्यात येत असल्याने त्या बद्दल चिंता व्यक्त केली आहे . काही उपद्रवी व्यक्ती द्वारे सोशल माध्यमावर बँकेविषयी बिनबुडाचे आरोप करून व खोटी माहिती प्रसारित करून बँकेची बदनामी केल्याने बँकेने याची गांभीर्याने नोंद घेतली असून अशा खोट्या अफवा पसरविणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व ग्राहकांना अशी विनंती केली आहे की अशा अपप्रचाराला कडे दुर्लक्ष करावे. किंबहुना बँकेचे लाखो ग्राहक, खातेदार व भागधारक अत्यंत सुस्थितीत असून बँकेकडे पर्याप्त भांडवल आहे .बँकेवर विश्वास ठेवावा व अशा खोट्या एसएमएस पासून सावध रहावे अशी नम्र विनंती ही त्यांनी याप्रसंगी केली आहे .
0 Comments