हरित राखी पौर्णिमेचा अभिनव उपक्रम --- वृक्षांना राखी बांधून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश

                  सिल्लोड --"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे"हा जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा अभंग वृक्ष व मानव यांचे नातेअधोरेखित करतें. वृक्ष संस्कृती जोपासण्यासाठी शहरातील   पर्यावरण  क्षेत्रात  सातत्याने कार्य करणाऱ्या अभिनव प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने संस्थेच्या सदस्या व नगरसेविका अश्विनी किरण पवार यांच्या संकल्पनेतून आज राखी पौर्णिमेच्या पूर्व संध्येला व स्वागताला  सिल्लोड येथे " हरित राखी  पौर्णिमा'" साजरी करण्यात आली. मनोरम्य परिसरात साजरा झालेला हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. झाडांभोवती पर्यावरणाचा संदेश देणारी रांगोळी, जमिनीवर " वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती। या ओळी रेखाटल्या होत्या .झाडांच्या पाना ,फुलां पासून बनवलेल्या  "हरित राख्या " झाडांना बांधून,त्यांचे विधिवत पूजन करून हा हरितोत्सव साजरा झाला.सामाजिक अंतराचे पालनही करण्यात आले. या वेळी  झाडांचे ऋण व्यक्त व्हावे व बहिणीने वृक्ष बंधुस काही द्यावे व त्यास दिर्घ आयुष्य लाभावे म्हणून जैविक खत झाडांच्या मुळाशी अर्पित करण्यात आले.                                        
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सायली पाटील यांनी केले.या वेळीं शारदा पवार,स्वाती चव्हाण,सुवर्णा बडक, शारदा सूर्यवंशी,रुपाली चव्हाण, ताईबाई पवार,राधिका तायडे, डिंपल वाघ, साधना गीरी, मनीषा पाटील,,प्रतीक्षा तायडे यांनी झाडांना राख्या बांधून या कार्यक्रमास अलंकृत केले.

झाडे आपणास ऑक्सिजन, फुल ,फळे ,लाकूड, अन्न,सावली देतात .प्रदूषनापासून आपले रक्षण करतात .त्यामुळे पाऊस पडतो.2020 हे वर्ष युनेस्कोने "वृक्ष संवर्धन वर्षं " म्हणून जाहीर केले आहे.यांच्या उपकराचे ऋण फेडावे म्हणून झाडांना  पाना -फुलांच्या राख्या बांधून  व त्या राख्या   नंतर झाडाच्या खाली पडून त्याचे कंपोस्ट खत बनून त्याचे आयुष्य वाढेल ही पर्यावरणपूरक भावना या मागे आहे.ऑक्सिजन रुपी ओवाळणी झाडे आपणास रोजच देतात. राज्यातील सर्व महिलांनी असे ऋण व्यक्त करावे --
अश्विनी पवार,नगरसेविका, सिल्लोड.


Post a comment

0 Comments