दरेगाव येथे भारतीय जनता पक्षाचे आंदोलन

 खुलताबाद -आज दिनांक 1 ऑगस्ट 2020 शनिवार रोजी ,सकाळी 8 वाजता कर्तव्यदक्ष आमदार श्री प्रशांत भाऊ बंब यांच्या मार्गदर्शनाखाली दरेगाव येथे भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस रत्नपुर श्री शिवाजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले ,
या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या.

गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर 10 रुपये अनुदान द्या.

दुध खरेदीचा दर प्रती लिटर 30 रुपये करा.

दुध भुकटी निर्यातीला प्रती किलो 50 रुपये अनुदान द्या.

    राज्यातील सर्व दुध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असुन, गायीला खाद्य, चारा, ढेप,घालण्याकरिता जो खर्च येतो, तो खर्चही आज निघत नाही, अशावेळी शेतकरी खूप चिंतेत असून भविष्यात दुध उत्पादन करायचे की नाही या विवंचनेत आजचा शेतकरी दिसुन येत आहे. राज्य सरकारने या बाबीचा विचार करून काही तरी निर्णय घेऊन शेतकरी बांधवाला योग्य न्याय द्यावा, अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या.
यावेळी दरेगावचे सरपंच श्री गणेश बोर्डे, रावसाहेब महाराज, काकासाहेब गायकवाड, सुरेश गायकवाड, सुभाष गायकवाड, चंद्रभान आण्णा, योगेश पुरी,रामेश्वर गायकवाड, सतिष गायकवाड, यांची प्रमुख उपस्थिती होती

Post a comment

0 Comments