आमदार गोगावळे यांच्या हस्ते प्रशासकीय अधिकारी आणि डाॅक्टर यांचा सत्कारमहाड -
२०२० या नवीन वर्षाची सुरूवात झाली आणि आपल्या देशावर न्हवे तर संपूर्ण जगावर कोरोना विषाणूच्या राक्षसाने थैमान घातले चिन मधून उगम पावलेला कोरोना बघताबघताच संपूर्ण जगभर पसरला आणि कित्येक निष्पाप लोकांना आपले जीव गमवावे लागले कोरोना विषाणू वर आजतागत कोणते ही औषध नसल्याने सहाजिकच मोठ्याप्रमाणात भीती निर्माण झाली अशावेळी या महामारीचा प्रसार रोखण्यासाठी देश लाॅकडावून करण्यात आला माञ कोरोनाचा प्रसार थांबला नाही अशा बिकट परसस्थितीत आपल्या देशातील डाॅक्टर नर्स आणि हाॅस्पिटल प्रशासन यांनी आपल्या जिवाची परवा न करता आपले कार्य पारपाडले यामध्ये अनेकांना आपले जीव देखील गमवावे लागले तरी देखील या सर्व डाॅक्टर आणि हाॅस्पिटल प्रशासन यांनी आपल्या कार्याला म्हत्व देत कोरोना रुग्णांनची काळजी घेऊन त्यांची सेवा केली अशा बिकट परसस्थितीत कामकरणार्या या कोरोना योद््ध्यांनचा खरोखरच सत्कार होणे हे देखील तितकेच म्हत्त्वाचे समजून आज महाड पोलादपुर माणगावचे आमदार भरतशेट गोगावळे यांनी आज महाड पोलादपुर  तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅक्टर आणि त्यांचे सहकारी यांचा सत्कार शिवसेना पक्षाच्या वतीने महाड प्रांत कार्यालय येथे आज करण्यात आला 
त्याचप्रमाणे या सहा महिण्याच्या काळात प्रशासनाचे संपूर्ण अधिकारी देखील आपली भूमिका बजावत होते त्यामध्ये महाड पोलादपुरचे प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार महाडचे तहसीलदार चंद्रसेन पवार हे देखील आपले कार्य अभिजात पणे निभावत होते त्यांच्या या कार्याची दखल घेत आमदार गोगावळे यांनी सत्कार केला आहे
यावेळी या सत्कार पर कार्यक्रमासाठी महाड पोलादपुर माणगावचे आमदार भरतशेट गोगावळे प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदर यांची प्रमुख उपस्थिती होती

Post a comment

0 Comments