श्री स्वामी समर्थ भक्त डॉ सुरेश शेठ यांचे निधन


प्रतिनिधी:-सुरेश शिंदे रायगड पोलादपुर 

पोलादपूरच्या वैद्यकीय इतिहासातील  सुरूवातीचे पान म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर सुरेश शेठ यांचे वयाच्या 83 वर्षी दुःखद निधन झाले.         पोलादपूरच्या सरकारी  दवाखान्यापासून सुरू  झालेला  प्रवास  गेल्या दोन वर्षापर्यंत  अविरत  चालू  ठेवणारे पन्नास वर्षांपूर्वी पोलादपूर  तालुक्यात  दुर्गम  ग्रामीण  भागातील रूग्णांच्या सेवेचे घेतलेले  व्रत आमरण निभावले.जुन्या  पण अनुभव  सिध्द  औषधोपचाराने त्यांनी अनेकांना रोगमुक्त केले. आध्यात्मिक  पार्श्वभूमी  असल्याने लोकांना  औषधोपचाराबरोबर मानसिक  धीर सुध्दा  मिळे.विशेष म्हणजे स्वामी समर्थांची रोजची साग्रसंगीत पूजा झाल्यावर डॉक्टर  पेशंट  तपासणी चालू  डॉक्टरांची घरची होमियोपॅथी परंपरा, स्वतःचे आयुर्वेद ज्ञान व अनुभवाने अॅलोपथी असा त्रिवेणीसंगम बघायला मिळे.काटक प्रकृतीचे डाॅक्टर आयुष्याच्या  उत्तरार्धात संधिवाताने बेजार झाले.गुडघ्याचे आॅपरेशन  सुद्धा  यशस्वी  झाले.पोलादपूरच्या सामाजिक जीवनात  त्यांनी  आपली ओळख  निर्माण  केली .उतारवयात  डाॅक्टर  एकाकी  वाटत. त्यांच्या  वैद्यकीय  सेवेचा वारसा मुलगा स्मितेश  व सून रश्मी  समर्थपणे  पुढे  नेत आहेत.

Post a comment

0 Comments