मोबाईल ऑनलाइन संचाची दुरुस्ती तालुक्याच्या ठिकाणी करण्याची मागणी


वैजापूर(प्रतिनिधी)/ राहुल त्रिभुवन

एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन कामकाजासाठी दिलेले मोबाईल संचाची दुरुस्ती तालुका पातळीवर करण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली.ग्रामीण भागात कोरोना
संसर्गामुळे अंगणवाडी बंद ठेवण्यात आली आहे.अंगणवाडीतील ६ महीने ते ३वर्ष तसेच  ६ वर्ष वयोगटातील मुले,त्यांच्या पालक , गरोदर, स्तनदा माता, यांचे व्हाटँस अँप ग्रुप तयार करुन त्यांना घरपोहच आहार व आरोग्य विषयी माहिती तालुका समन्वयकांना ऑनलाईन कळवणे सक्तीचे केले आहे. दरम्यान अनेक अंगणवाडी सेविकांचे मोबाईल नादुरुस्त झाले आहेत.दुरुस्ती करिता मोबाईल संच एकात्मिक बालविकास विभागातील तंत्रिक ऑपरेटर सुनिता कानडे यांच्या मार्फत  औरंगाबादला येथील सर्व्हिस सेंटरकडे पाठवण्यात येतो.तंत्रिक ऑपरेटर या कार्यालयात नियमित हजर राहत नसल्याने मोबाईलची दुरुस्ती झाली की नाही यांची शहानिशा होत नाही.त्यामुळे जिल्हयाच्या ठिकाणी मोबाईल दुरुस्त करण्याऐवजी तालुका स्तरावर ही दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष माया पगारे, तालुकाध्यक्ष गीतांजली पहाडे यांनी केली.यावेळी जेष्ठ पत्रकार प्रशांत त्रिभुवन हे उपस्थित होते.

Post a comment

0 Comments