शिक्षणमंत्र्यांच्या समोरच शिक्षकांनीच उडविला सोशल डीस्टन्सिंग चा फज्जा ; मंत्र्यांच्या स्वागतासाठी चढाओढऔरंगाबाद
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्या उपस्तीतीत आज हॉटेल विंडसर कॅस्टल येथे युपीएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र कार्यक्रम संपताच शहरातल्या विविध संस्था चालकांनी तसेच शाळेच्या शिक्षकांनीच शालेय शिक्षण मंत्र्यांचा सत्कार करण्यासाठी चढाओढ आणि फोटोसेशन करत सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा उडवला. काँगेस च्या पदाधिकाऱ्यांनी या शिक्षकांना शिस्तीने येण्याचे आवाहन करूनही या शिक्षकांनी मात्र लॉक डाऊन चे सर्व नियम धाब्यावर बसवले. विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षकच असे करत असतील तर विद्यार्थ्यांनी या शिक्षकांकडून काय शिकावे अशा चर्चाना कार्यक्रमात उधाण आले होते.शिक्षण विभागातील विविध अडचणी व प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज शहरात आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासमोर अनेक शिक्षकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचत निवेदनांचा अक्षरशः पाऊस पाडला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनीही या शिक्षकांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र शिक्षकांनी त्यांच्या अवाहानाकडे दुर्लक्ष करत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी चांगलीच चढाओढ केली. त्यामुळे जर शिक्षकच असे वागत असेल तर शाळेत विद्यार्थ्यांना कसे पाठवणार असा प्रश्न यावरून निर्माण होत आहे.

Post a comment

0 Comments