आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर उपलब्ध


निलेश जांबले दौंड-पुणे

  दौंड तालुक्यात व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे व्हेंटिलेटर उप्लब्धते बाबत लक्ष वेधले त्याची दखल घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे आज दौंड उपजिल्हा रुग्णालयाला ३ व्हेंटिलेटर प्राप्त झाले असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली. 
   या  एका व्हेंटिलेटरची किंमत सुमारे १२ लाख ५० हजार रुपये  असुन व्हेंटिलेटर उपलब्ध होणारे दौंड उपजिल्हा रुग्णालय हे ५० बेड्चे पुणे जिल्ह्यातील पहिलेच रुग्णालय आहे. 
     याबाबत बोलताना आमदार कुल म्हणाले की , दौंड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेला बळकटी देणारे हे पाऊल असून याद्वारे शासकीय यंत्रणेमार्फत उपचार घेणाऱ्या गोर गरीब रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांचे देखरेखी खाली यांचे संचालन केले जाणार आहे.
   दौंड शहर, दौंड ग्रामीण व राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आदी सर्व विचारात घेता तालुक्यात आज पर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेले सुमारे ६३३ रुग्ण आढळले आहेत यातील २३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्य झाला तर ४४८ रुग्ण उपचारांती बरे होऊन परतले आहेत व १६२ रुग्ण हे उपचार घेत आहेत. आजतागायत दौंड तालुक्यातील ५०२२ हुन अधिक नागरिकांची कोविड तपासणी करण्यात आली आहे. 
कोरोना विरुद्धच्या या लढ्यामध्ये दौंड तालुक्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा अहोरात्र कार्यरत राहून नागरिकांना सेवा देत आहे.  कोरोना रुग्णांची तपासणी, उपचार, विलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी सोयी सुविधा आदी बाबत तालुका प्रशासन दक्ष राहून वेळीच योग्य पाऊल उचलत आहे या साठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, डॉ. शशिकांत ईरवाडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक राजगे यांच्या सह सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, परिचारिका भगिनी विशेष कौतुकास पात्र आहेत. एकमेकांच्या साथीने आपण सर्व मिळून लवकरच या संकटाला मात देऊ असा  विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a comment

0 Comments