वैजापूर (प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) :
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय निकम यांच्या मनमानी कारभाराला त्रस्त होऊन अखेर समितीच्या १८ पैकी १३ संचालकानी त्यांच्याविरुद्ध अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांंच्याकडे बुधवार (ता.१२) रोजी अविश्वास ठराव दाखल केला.
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडून आलेल्या संचालक व सभापती यांचा वाद तालुक्यासाठी काही नवीन नाही. यावर कहर म्हणजे मागील काही दिवसांपासून समितीच्या सभापती पदासाठी सुरु असलेले संगीत खुर्चीचा खेळ होय. मागील वर्षी संजय निकम यांनी शर्थीचे प्रयत्न करत माजी सभापती दादासाहेब पाटील यांना पदावरून खाली खेचण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. पाटील पदावरून पायउतार होताच. या पदावर रामहरी जाधव यांची वर्णी लागली. जाधव यांंनी पदाचा कारभार सुरळीत पार पाडला. त्यांच्या नंतर सभापती पदी संजय निकम यांची निवड करण्यात आली. निकम यांनी काही दिवस संचालकासोबत गुण्यागोविंंदाने कारभार केला खरा मात्र बाजार समितीच्या आवारात विविध ठिकाणी करावयाचे बांधकाम व या बांधकामात निकम यांचा 'एकांत रस' हा इतर संचालकांच्या पचणी पडला नाही. याशिवाय इतर निर्णयातही निकम यांंनी एकहुकुमी कारभार सुरु ठेवल्यानेही बहुतेक संचालक त्यांच्यावर नाराज होते.
0 Comments