शेतक-यांना दुष्काळ अनुदान लवकर मिळणार- मा आ संजय वाघचौरे


पैठण प्रतिनिधी.विजय खडसन :- पैठण तालुक्यातील कापुस  व फळबाग उत्पादक  खातेदाराच्या नावात तफावत व खाते क्रमांकांत चुका असल्या कारणाने अनेक शेतकरी गेल्या दोन वर्षापासुन अनुदानापासून वंचीत असल्याने तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत, आज माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाचे नियम पाळत सोशल डिस्टसिंगसह शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात येऊन दुष्काळाच्या अनुदानाचे वाटप संदर्भातील तक्रारीचा पाडा वाचला यावर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी या आठ ते दहा दिवसात राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न निकाली काढला जाईल असे सांगितले. मागील दोन वर्षा पासून आखातवाडा, पोरगाव, दिन्नापुर, म्हारोळा, हर्षी, दावरवाडी, आडूळ, रांजनगाव खुरी, डोणगाव, ब्राम्हणगाव, धनगाव, ईसारवाडी सह तालुक्यातील एक हजारच्या जवळपास शेतकऱ्यांचे कोणत्या ना कोणत्या कारणाने  दुष्काळ अनुदान मिळाले नसल्याने आज तहसील कार्यालयात शेकडो शेतकऱ्यांनी दुष्काळ अनुदानासाठी ठिय्या दिला. यावेळी माजी आमदार संजय वाघचौरे, गोविंद शिंदे, डॉ गुलदाद पठाण, रावसाहेब आडसुळ, काकासाहेब कनसे, बाबासाहेब बोडखे,  अॅड. सुभाष खडसन ,अनिल हजारे, सलीम शेख, रामेश्वर लघाने, श्रीकांत तरमळे, प्रभाकर निळ, मच्छिंद्र मोटकर, सुभाष बाबर,  राजू शेख, निवृत्ती पोकळे, मुस्तफा पठाण, चंद्रकांत खांडे, बाळू पठाडे, यांच्या सह शेकडो शेतक-यांनी तहसीलदार यांच्या कडे अनुदान मिळाले नसल्याचे सांगितले, यावर तहसीलदार शेळके यांनी या आठ ते दहा दिवसात राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले.

Post a comment

0 Comments