गृह राज्यमंत्री .शंभूराजे देसाई यांना मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य समन्वयकांचे रोहा तालुक्यातील पिडित कुटुंबाला न्याय द्यावी यासाठी निवेदन

:

प्रतिनिधी/गणेश गांडूळे
             सोलापूर -          मंत्रालय मध्ये महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री माननीय नामदार श्री शंभूराजे देसाई साहेब यांना मोजे तांबडी बुद्रुक तालुका रोहा जिल्हा रायगड येथील मराठा समाजाचे प्रीती महादळेकर हिची हत्या झाल्यालेल्या पार्श्व भूमीवर मराठा क्रांती  मोर्चा राज्य समन्वयक यांनी निवेदन दिले. पीडित कुटुंबातील लोकांना  तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली.१४ वर्षीय अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आले असल्याने  आरोपी नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा होण्यासाठी फास्ट्रॅक कोर्टात विशेष सरकारी वकील म्हणून श्री उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या वतीने करण्यात आली यावर गृह राज्यमंत्री श्री शंभूराजे देसाई साहेबांनी विषयाचा सर्व तपास योग्य दिशेने करून ज्या त्रुटी निर्माण झाले असतील त्या लवकरच पूर्ण करू,कोणत्याही परिस्थितीत कुटुंबीयाला गरज पडली तर संरक्षण देऊ असे आश्वासित केले. यावेळी रायगड एस पी व मराठा क्रांती ठोक मोर्चा,राज्य समन्वयक   सुनील नागणे, महेश डोंगरे व  महेश राणे उपस्थित होते.

Post a comment

0 Comments