महाकवी वामनदादा कर्डक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध शेत्रातील मान्यवरांचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मान


वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 

महाकवी वामनदादा कर्डक यांच्या ९८ वी जयंती व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त लोक कलावंत सांस्कृतिक मंच (मुंबई) यांच्या वतीने आज रविवार दि.१६ रोजी विविध शेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्य वरांचे कोरोना योध्दा म्हणुन गुण गौरव तथा पुरस्कार सोहळा वैजापूर येथे पार पडला. 
कार्यक्रमाचे उद्घाटन नगरअध्यक्षा शिल्पाताई दिनेश परदेशी यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त रविंद्र आप्पा साखरे, वैजापूर भुषण पुरस्कार प्राप्त प्रकाश शेठ बोथरा, लोक कलावंत मराठवाडा उपाध्यक्ष शाहिर अशोक बागुल, लोक कलावंत जिल्हा अध्यक्ष एकनाथ त्रिभुवन, लोक कलावंत तालुका अध्यक्ष आबासाहेब जेजुरकर, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पारस पेटारे, दिपक त्रिभुवन, अण्णासाहेब ठेंगडे,शैलेश नन्नवरे, जे के बोरगे, रामराव बागुल आदीच्या उपस्थितीत पुरस्कार प्राप्त मान्य वरांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी श्रुती बोयनर हिचा दहावी मध्ये सर्वोकृष्ट गुण मिळवल्यामुळे विशेष सत्कार करण्यात आला तर डॉ दिनेश राजपुत यांनी कोरोना काळात बाकी डॉक्टर यांनी रात्रीच्या वेळी महिलेच्या प्रसूती स नकार दिल्यानंतर त्यांनी दवाखान्यात दाखल करून सामान्य प्रसूती केली म्हणून त्यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला तसेच मोईस बेग,विजय खोकड व धनंजय भावे   या पोलीस बांधवांचाही यावेळी कोरोना योद्धा म्हणून सन्मान  करण्यात आला.
या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी हनुमंत बोयनर, श्रुती बोयनर,नगरसेवक दशरथ बनकर,आकाश बागुल, संजय त्रिभुवन ,वसीम शेख,वंदना त्रिभुवन,वैशाली पेटारे, दैनिक प्रतिवीर औरंगाबाद आवृत्ती चे उप संपादक विलास म्हस्के,पत्रकार राजेंद्र जानराव,जिवन पठारे, सुधीर बागुल, वैजापूर पोलीस स्टेशन चे मोईस बेग, धनंजय भावे, विजय खोकड, दत्त हॉस्पिटल चे डॉ.दिनेश प्रल्हादसिंह राजपूत,
वाल्मिक पठारे,ऋषिकेश त्रिभुवन, सुप्रसिद्ध गायक नाना वीर, रुद्रा शेजवळ, विलास सोळसे, ज्ञानेश्वर शिरसाठ आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रमोद पठारे यांनी केले तर आभार निखिल ठेंगडे यांनी मानले.

Post a comment

0 Comments