सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून काही गावात शेती शाळा


 फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)

फुलंब्री तालुक्यातील काही गावात या गावांमध्ये शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ औरंगाबाद यांचे विश्वस्त सुहास आजगावकर यांच्या संकल्पनेतून व स्वंस्थेच्या माध्यमातून शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते ,शेती पिका विषयी मार्गदर्शन करण्यात आले,फुलंब्री तालुक्यातील काही गावामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्यात आलेली आहे.तसेच आता सध्या प्रकल्प गिरीजा च्या माध्यमातून एकूण 13 गावामध्ये जलसंधारणाचे, मुद्संधारणाचे,खोलीकरण, रुंदीकरण, माती बांध,बांध-बदिस्ती आशा वेगवेगळ्या प्रकारची कामे पुढील काही वर्षात करण्यात येणार आहे ,या वर्षी कोरोना परिस्थिती मध्ये म्हणावं तशी कामे करता आली नाही.

स्वंस्थेच्या माध्यमातून काही गावामध्ये डेमो प्लॉट घेण्यात आलेले आहे त्यामध्ये डेमो मध्ये गावातील काही मोजक्या शेतकऱ्यांना हळद बियाणे 1 क्विंटल वितरत आले होते तसेच काही भुईमूग,शेवगा व तूर चे बियाणे ही देण्यात आले होते ,शेती शाळेमध्ये दिलेल्या डेमो ची पाहणी करण्यात आली व शेती पिकावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच जीवमूर्त कसे बनवावे याचे प्रात्यक्षित करून दाखवण्यात आली.


 नांद्रा येथे शेती शाळेचे आयोजन करण्यात आले तर त्या अंतर्गत कार्यक्रमाला मठपती सर, योगेश शिंगारे, रतन अंभोरे,मनोज सर,गणेश दाभाडे आणि लहु ठोंबरे सरानी मार्गदर्शन केले व ठोंबरे सरानी कापूस पीका बदल व आणि मका पिक बदल मार्गदर्शन केले व जीवमृत कसे बनवयाचे व त्याचे काय फायदे आहे हे सांगण्यात आले. आशेच मारसावळी, शेलगाव, वाघोळा,नरला व नांद्रा या 5 गावात शेती शाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले व जीवमूर्त प्रात्यक्षित करून दाखवण्यात आले.त्या बरोबर डेमो प्लॉट साठी काही औषधांचे  वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची उपस्थिति होती.

Post a comment

0 Comments