जिल्हा पोलिस ग्रामीण च्या वतीने राजेंद्र जानराव,यांचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मानवैजापूर(प्रतिनिधी)/

वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जानराव, यांना औरंगाबाद जिल्हा ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या वतीने आज गुरुवार दि.20 रोजी कोरोना योध्दा म्हणुन गुण गौरव  पुरस्कार देण्यात आला. औरंगाबाद जिल्हा अधिकारी एस एस चव्हाण, औरंगाबाद जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण मोक्षदा पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे,यांच्या हस्ते सन्मान पत्र पुरस्कार देण्यात आले.लॉकडाऊन च्या काळात पोलीस प्रशासनाला मदत करणाऱ्यांचा आज रुख्मीणी हॉल एम जी एम औरंगाबाद येथे औरंगाबाद ग्रामीण आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव आणी मोहरम मध्यवर्ती शांतता समीती बैठकीत कोरोना योध्दा म्हणुन सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला यात खंडाळा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जानराव,यांना हि सन्मान पत्र प्रदान करण्यात आले.

Post a comment

0 Comments