अॅड. अमितकुमार खातू यांना पीएचडी


रायगड प्रतिनिध:-सुरेश शिंदे

 नाते गावचे सरपंच अशोक खातू यांचे सुपुत्र अॅड. अमितकुमार खातू यांना विधी शाखेतील त्यांच्या 'लिगल अॅस्पेक्टस् ऑफ सायबर सिक्युरिटी इन इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू डेटा प्रोटेक्शन : अ क्रिटिकल स्टडी' या प्रबंधाच्या संशोधनाकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी मिळाली आहे. आयएलएस विधी महाविद्यालय या संशोधन संस्थेत मूलभूत संशोधन करून त्यांनी यश प्राप्त केले आहे.
    अॅड. डॉ. अमितकुमार खातू यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण नाते येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू अनंत महाराज विद्यालयात घेतले. त्यांतर महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन पुणे येथे आयएलएस विधी महाविद्यालय येथून त्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन सन १९९९ मध्ये एलएलबी ही कायद्याची पदवी मिळविली. तसेच त्यांनी पुणे विद्यापीठाच्या विधी विभागातून एलएलएम ही पदव्युत्तर पदवी मिळविली.
   पुणे येथे स्थायिक होण्यापूर्वी त्यांनी महाड येथे दिवाणी न्यायालय व अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय केला. तसेच त्यांनी सन २००७ ते २००८ या काळात रायगड जिल्हा पोलीस विभागाचे विधी अधिकारी म्हणून देखील सेवा बजावली आहे.
   सन २००८ पासून अॅड. डॉ. अमितकुमार खातू हे पुणे येथे विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे विधी सल्लागार म्हणून स्थायिक आहेत. त्यांनी सन २०१५ ते २०१९ या काळात आयएलएस विधी महाविद्यालय या संशोधन संस्थेत मूलभूत संशोधन करून 'लिगल अॅस्पेक्टस् ऑफ सायबर सिक्युरिटी इन इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू डेटा प्रोटेक्शन : अ क्रिटिकल स्टडी' हा प्रबंध सादर केला. त्यासाठी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी ही जाहीर झाली आहे. या यशाचे श्रेय त्यांनी खडतर परिस्थितीत शिक्षण देणारे आपले आईवडील व मार्गदर्शक यांना दिले आहे. या उल्लेखनीय यशाकरिता अॅड. डॉ. अमितकुमार खातू यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Post a comment

0 Comments