छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने फुलंब्रीत कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध


फुलंब्री प्रतिनिधी; योगेश तुपे
कर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावांमधील नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने हटवला आहे. यामुळे शिवभक्तांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे, त्याचे राज्यभर प्रतिबिंब उमटले असून, फुलंब्री तालुक्यातही या घटनेचा निषेध व्यक्त करून फुलंब्री पोलीस स्टेशन यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्याची बातमी शनिवारी वाऱ्यासारखी पसरली. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली... फुलंब्रीत रविवारी सकाळी महात्मा फुले चौक मध्ये शिवभक्तांचे वतीने निषेध व्यक्त केला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या याचबरोबर काढलेला पुतळा लवकरात लवकर बसवण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला, त्याच बरोबर असे कृत्य करणाऱ्या वर कडक कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी शिवप्रेमींनी केली.
यापुढे अशा प्रकारे कोणत्याही महापुरुषांचा पुतळा हलवू नये,यासाठी कडक कायदे करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी नंदू मोटे, शुभम जगताप पाटील, शैलेश बोरसे, योगेश जोगदंड, सागर गाडेकर, ईश्वर भूमे, राजेश मेटे, पुरुषोत्तम मोरे,भारत भूमे, सुमित पंडित, मंगेश जाधव आदी शिवप्रेमी उपस्थित होते.
दरम्यान मनगुत्ती गावामध्ये ग्रामपंचायतीच्या परवानगीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता.
हा पुतळा हटवण्यात यावा यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता त्या विरोधात मनगुत्ती येथील नागरिक रस्त्यावर उतरले होते त्यानंतर पोलिसांनी माघार घेतली होती मात्र कर्नाटक सरकारने मनमानी करत हा पुतळा हटवला आहे.


Post a comment

0 Comments