(रामचंद्र घोड्मोडे श्रीवर्धन)
श्रीवर्धन तालुक्यात चक्री वादळाचा फटका एम एस ई बी ला मोठ्या प्रमाणात बसला होता. सर्व पोल कोलमडले होते .त्यावेळी पूर्ण तालुका अंधारात होता .22 दिवसानंतर लाईट पूर्ववत होण्यास सुरवात झाली. काहीं खेडेगावात तर दोन महिने उलटून सुध्दा लाईट आली नव्हती. सगळीकडे खांब कोसळले होते .बाहेर जिल्ह्यातील काहीं कर्मचारी आणण्यात आले होते .त्याना मदत प्रत्येक गावातील नागरिकांनी पोल व वायर ओढण्यास केली.तेव्हा वाटले होते की नवीन पोल नवीन वायर मूळे सतत वीज पुरवठा खंडित होणाऱ्या त्रासापासुन सुटका होइल असे वाटले होते. ते आत्ता स्वप्नच राहिल्याचे दिसुन येत आहें वीज पुरवठा चालू होतं नाही तोच श्रीवर्धन वासियांची ही समस्या कायमच आहें. काहीं दिवसात येणारा गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.घरांची साफसफाई व रंगरंगोटी केली जाते. त्यात लाईट नसल्यामुळे कामे करण्यास व्यत्यय येत आहेत़ .गणपती कारखानदारांचे हाल तर खूप होतं आहेत़. लाईटच्या लपंडावा मूळे मूर्ती रंगवायच्या कशा हा प्रश्न उभा राहिला आहें .लाईट असेल तेव्हा रात्रभर जागरण करून आपली कामे पूर्ण करीत आहेत़. वादळात झाडांची पडझड झाली होतीं त्याचा पाला कुजून मच्छरांनचा त्रास वाढला आहें .नेमकी रात्री झोपण्याच्या वेळेस लाईट जात असल्यामुळे लहान मुलाना झोपवने महिला वर्गाला मोठी कसरत करावी लागत आहें. लाईट मूळे होणारी कामे होतं नसल्याने नागरिकामध्ये नाराजीचा सूर उमटत आहें
0 Comments