अठरा वर्षांपासून राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री आदर्श गाव किनगाव येथील बाळासाहेब शिंदे यांचे अनोखे देशप्रेम


 फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे) 

      ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला गावातील सर्वच शासकीय कार्यालयातील राष्ट्रध्वजांना  गेल्या 18 वर्षांपासून इस्त्री करून देण्याच काम आदर्श गाव किनगाव येथील बाळासाहेब शिंदे हे करत आहे.
      किनगाव येथील बाळासाहेब शिंदे हे अनेक वर्षांपासून इस्त्री करण्याचा व्यवसाय करतात , राष्ट्रध्वजावर अमाप प्रेम असल्याने स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन यावेळी गावातील सर्वच ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला शासकीय कार्यालये, शाळा - महाविद्यालयातील सर्वच राष्ट्रध्वजांना मोफत इस्त्री करून आपले अनोखे देशप्रेम जोपासत आहे.
    शिंदे यांनी सांगितले की, यावर्षी च्या स्वातंत्र्य दिनाला हा आपला 475 वा ध्वज मी इस्त्री करून देत आहेत.

Post a comment

0 Comments