श्रीवर्धन मध्ये घरघुती गणरायाचे जल्लोषात स्वागत!


(रामचंद्र घोडमोडे श्रीवर्धन)

 भाद्रपद महीन्यात येणारा गणपती  सण कोकणात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो .मुंबई इथे कामानीमत्त असणारे चाकरमानी आपल्या मूळ गावी गणपती सणासाठी आवर्जून  उपस्थित असल्याचे पाहावयास मिळत आहें. मार्केट मध्येही खरेदी साठी मोठ्या प्रमाणात गर्दी    झाल्याचे दिसत आहें चाकरमान्यांनी तर दोन दिवस आगोदर पासून गावी येऊन विद्युत रोषणाई डेकोरेशन केलेले आहें कोकणात  प्रत्येक घरात गणराचे आगमन होतं असते.गणपती बाप्पा मोरया जयघोष व आरती होतं असल्याने पूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहें. कोरोना विषाणु च्या पार्श्वभूमीवर  आरती व पूजन शासनाने आखून दिलेल्या नियम व अटी नुसार  खबरदारी घेऊन आपला  सण  साजरा करत आहेत़.लहान मुलें तर गणरायाच्या आगमानाने खूप खूष झाल्याचे चित्र श्रीवर्धन मध्ये पाहावयास मिळत आहें.

Post a comment

0 Comments