पैठण न.प.प्रशासनाचे दुर्लक्ष शहरात वाढतेय घाणीचे साम्राज्य


पैठण प्रतिनिधी. विजय खडसन:—
 पैठण गेल्या  तिन,चार दिवसांपासून पडत असलेल्या सतंतधार पावसाने पैठण नगर परिषद प्रशासनाचे पितळ चांगलेच उघडे पाडले व चव्हाट्यावर आनले आहेत. नियमित साफसफाई व स्वच्छता होत नसल्याने मेनरोड भागासह बहुतेक प्रभागातील लहान मोठे नाले - गटारीमुळे  रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागल्या असल्याचे चित्र रविवारी दुपारी ठीक ठिकाणी पहायला मिळाले. नगर परिषदेचा होता तोही "राम भरोसा "कारभार गेल्या काही दिवसांपासून ठप्प झाल्यामुळेच पावसाळ्यात ही परिस्थिती पुन्हा उद्भवल्याची संतप्त प्रतिक्रिया विविध वार्डातील रहिवाशांमधुन व्यक्त होऊ लागली आहे. किरकोळ पावसाने शहरातील बहुतेक नाले व गटारी ओव्हरफ्लो, तूडुंब भरल्यामुळे  नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या नाल्या- गटारीतील दूषित पाणी वाट सापडेल त्या पध्दतीने मार्गस्त होत आहे. नादूरूस्त रस्त्यावर ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुषीत पाणी साचले असुन यातून असुरक्षित पणे वाहनधारक व पादचाऱ्यांना मार्गस्त व्हावे लागत आहे. नगर परिषद प्रशासनाने या कडे वेळीच लक्ष देऊन उपाययोजना केल्या नाहीत तर शहरात रोगराई पसरण्याची भिती रहिवाशांना भेडसावत आहे.शहरात एकीकडे मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असताना दुसरीकडे पैठण नगर परिषदेने आता पर्यत महिना काठी लाखो रुपयांचा चूराडा केला आहे

Post a comment

0 Comments