वैजापूर तालुक्यातील खंडाळ्यात चोरांच्या हल्ल्यात एक जण जखमी
वैजापुर(प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन


वैजापुर तालुक्यातील खंडाळा या ठिकाणी भवरबेंद येथे चोरट्यांनी बुधवारी रात्री च्या सुमारास चोरी करत असताना अचानक जाग आल्यामुळे एका शेतकऱ्यास मारून मारून जखमी केले.

सविस्तर वृत्त असे की खंडाळा येथील भवरबेंद वस्तीवर रात्रीच्या सुमारास तीन अज्ञात चोरांनी पांडुरंग कारभारी पवार यांच्या घरी चोरी करत असताना कारभारी पवार यांना अचानक जाग आल्यामुळे पळण्याचा प्रयत्न करत असताना कारभारी पवार यांना जोरदार पणे काठी ने मारून मारून जखमी केले असून त्यांना तात्काळ वैजापुर येथील देवगिरी या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .
 या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी गोपाल रांजनकर,पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली  कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर आपल्या सहकार्यासोबत  तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
 तीन चोर चोरी करण्यासाठी घरात शिरली त्यावेळेस पवार हे जागे झाले असता तीन अज्ञात चोरांनी त्यांना काठी ने मारून मारून जखमी केले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गुरुवारी सकाळी डॉग स्कॉड,फिंगरफीन्ट घेण्यासाठी फोरणसिंक खाते तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी गोपाल रांजनकर,पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी,पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर,बिट जमादार मोईस बेग व पोलीस पाटील नितीन बागुल यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पाहणी करण्यात आली. यावेळी सदरील शेतकर्यांचे तीन मोबाईल चोरीला गेले असून किरकोळ रक्कम सुद्धा चोरण्यात आली आहे. त्यामुळे तीन अज्ञात चोराविरुद्ध वैजापुर पोलीस ठाण्यात भादवी कलम 394 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर हे करत आहे.

Post a comment

0 Comments