उत्सव साजरा करतांना सकारात्मक विचार ठेवून गरिबांना मदत करीत भक्ती दाखवून देऊ शकतो - मोक्षदा पाटील


औरंगाबाद - आज औरंगाबाद येथे जिल्हा शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या सह पोलिस अधीक्षक  यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले
यावेळी पोलीस अधीक्षक श्रीमती पाटील म्हणाल्या की, गणेशोत्सव आणि मोहरम साजरा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनाचे सर्वांनी पालन करावे. तसेच मनात भक्तीभाव ठेवून घरीच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.  शासनाच्या या आवाहनास सर्वांनी पाठींबा दर्शविल्याबद्दल सर्व लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले. तसेच कोरोना काळातील उत्कृष्ट कामगिरी बाबत पोलीस विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाचेही  अभिनंदन केले. 
श्रीमती पाटील म्हणाल्या की, आतापर्यंत आपण सर्व सण घरातच शांतपणे साजरे करून सहकार्य केले आहे. कोरोना संकट काळात हातावर पोट असनारे खुप अडचणीत आहे तेव्हा आपण उत्सव साजरा करतांना सकारात्मक विचार ठेवून गरिबांना मदत करीत भक्ती दाखवून देऊ शकतो. तेव्हा सर्वांनी आपल्या घरात गणेशोत्सव साजरा करीत व गणपती विसर्जनावेळीही गर्दी टाळायची आहे. सर्व गणेश मंडळासाठी गणपतीची मुर्ती 4 फुट तर घरगुती गणेश मुर्ती 2 फुटांची असावी. विसर्जनाच्या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वाहनातून या गणेशमुर्ती व्यवस्थित विसर्जन केले जाईल. त्याचबरोबर इतर मार्गदर्शक सूचना स्थानिक पोलीस स्टेशन व औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस यांच्या फेसबुक वर उपलब्ध करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उत्सव  काळात मिरवणूका, सांस्कृतीक कार्यक्रम,  भंडारा यांना परवानगी नाही. तरी आपण डिजिटल सण साजरा करू शकतो. यासाठी ऑनलाईन रांगोळी स्पर्धा, निबंध, सेल्फी वीथ ट्री यासारख्या स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्यांना घरपोच पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असल्याचेही श्रीमती पाटील यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनास पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच काही गणेशोत्सव मंडळांनी वर्गणीतून गरिबांसाठी मास्क, सॅनिटायझर देणे, रक्तदान, प्लाझ्मा दान याबाबत जनजागृती करीत नियम व शिस्त पाळत गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे सांगितले. 

Post a comment

0 Comments