कोरोना मुळे मंडप व्यवसाय बंद झाल्याने केले नाष्टा सेंटर सुरू


 *फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)* 

सध्या सुरू असलेल्या कोरोना परिस्थिती चा जर आपण विचार केला तर कित्येक जनांना आपला सुरू असलेला व्यवसाय बंद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले,काहीचा उदरनिर्वाह असलेला व्यवसाय बंद झाला त्यातूनच काहींना आशेचे किरण मिळाले व त्याच परिस्थिती आज काहींनी व्यवसाय सुरू करून कोरोना वर मात केली.

अशा या परिस्थितीमध्ये देखील स्वतःचा परिवार सांभाळण्यासाठी मेहनत करून धैर्याने व्यवसाय करणारी शक्ती स्वरूप भगिनी आज पाहायला मिळाली.

 जि प सभापती सौ अनुराधाताई चव्हाण  भोकरदन वरुण परत येताना हे छोटेसे घरगुती स्वरूपाचे एका रिक्षा मध्ये "नाश्ता सेंटर" सुरू झालेले दिसले. या भगिनीला सहकार्य करण्याची इच्छा झाली. गाडी थांबविली. चर्चा केल्यावर कळले की कोरोना परिस्थितीमुळे लग्न सराई बंद असल्याने, त्यांच्या मंडप सेवेचा व्यवसाय बंद आहे. म्हणून पर्याय म्हणून हा व्यवसाय सुरू केला. 

अतिशय स्वाभिमानी अशा या भगिनीला मानाचा सलाम. तिचा व्यवसाय वाढावा यासाठी आपणही कोणी भोकरदन ते हासनाबाद रोड वर आपणही आपला थोडा वेळ देऊन स्वादिष्ट आणि घरगुती पद्धतीने केलेल्या सात्विक नाष्ट्यांचा आस्वाद घ्यावा.. हेच तिच्या स्वाभिमानाला संभाळून सहकार्य आपण करू शकतो.

Post a comment

0 Comments