महावितरण कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण औरंगाबादचे नवे जिल्हाधिकारी


औरंगाबाद -  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत (महावितरण) सह व्यवस्थापकीय संचालक  सुनील चव्हाण यांची रिक्त असलेले संभाजीनगर जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. उदय चौधरी यांची मुंबई येथे मंत्रालयात उपसचिव पदी बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. चव्हाण यांची जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्यानंतर दिलासा मिळाला आहे. अपर मुख्य सचिव ( सेवा) सिताराम कुंटे यांच्या सहीने निघालेल्या आदेशात म्हटले आहे त्वरित जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारावा. मराठवाड्याचे भूमीपूत्र असलेले सुनील चव्हाण यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून एमएससी अग्री आणि व्यवस्थापन या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मंत्रालयात उपसचिव म्हणून काम पाहीले. ठाणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून साडेतीन वर्षांत अनेक योजना यशस्वी केले. महापालिकेत स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून योजना राबवल्या. रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना तिवरे तालुका चिपळूण धरण फूटीच्या दूर्घटनेमध्ये आपत्तीग्रस्तांना मदत करण्यात उल्लेखनीय कामगिरी केली. जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत दहा हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा व काजू फळबाग लागवडीसाठी पुढाकार घेतला होता. ३ एप्रिल रोजी महावितरणच्या सहाय्यक संचालकांचा त्यांनी पदभार स्विकारला होता. आता संभाजीनगर जिल्हाधिकारी पदाची मोठी जवाबदारी शासनाने त्यांना सोपवली आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखने व जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे होत असलेला परिणाम हे आवाहन त्यांच्यासमोर आहे

Post a comment

0 Comments