सँटेलाईट कंपणीत क्रेंनखाली दबुन ट्रक चालकाचा मृत्यू


पैठण प्रतिनिधी.विजय खडसन:—  आज सकाळी  9:30 —10:00 हा  दरम्यान पैठण एमआयडीसी परिसरात असलेल्या सँटेलाईट कंपनीत क्रेण पलटी होऊन कंपनीचे लोखंडी प्लेट घेऊन आलेल्या ट्रक चालक नाव. दिलीप रामराव   खुर्दे वय 48 राहणार.तिसगाव. औरंगाबाद वाळूज पंढरपूर येथील ट्रक चालकाचा लोखंडी प्लेट ट्रकमधून क्रेणच्या साह्याने खाली करत असतांना क्रेण चालकाला साईट सांगत असतांना क्रेणचा अचानक तोल गेल्याने क्रेण पलटी होऊन क्रेणखाली दबुन जाागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनला मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील घटनास्थळी दाखल झाल्या

याबाबत सविस्तर माहिती नुसार पैठण एमआयडीसी परिसरा मध्ये सँटेलाईट फार्मा सिर्टिकल केमिकल बनवणार्‍या कंपनी मध्ये गुरुवारी सकाळी 9:30 ते 10:00च्या सुमारास हि दुर्घटना घडली या दुर्घटनेत दिलीप रामराव खुर्दे वय 48 वर्षे रा.तिसगाव ता. औरंगाबाद हा जागीच ठार झाला आहे.दिलीप खुर्दे हा पढरपुर - वाळुज येथुन आयशर क्र.एम.एच.ई.व्यु. 6082 मध्ये लोखडी प्लेट घेऊन पैठण एमआयडीसीतील सँटेलाईट कंपनीत आला होता. यावेळी ट्रक मधुन क्रेंनच्या साहार्‍याने लोखडी प्लेट उचलतानां क्रेंनच्या हुकातुन बेल्ट निसटल्याने क्रेंनचे संतुलन बिघडले व क्रेंन पलटी झाले यावेळी क्रेंनच्या बाजुला उभा असलेला ट्रक चालक दिलीपचा जागेवरचं मूत्यु झाला.सँटेलाईट फार्मा हि कंपनी घातक रसायन तयार करणारी कंपनी असुन गेल्या 4-5 वर्षापुर्वी याचं कंपनीत रसायन मिश्रण करणार्‍या टाकीत स्फोट होऊन एका कामगाराच्या शरीराच्या चिधळ्या उडाल्या होत्या त्या नतर पुन्हा हि दुर्घटना घडल्याने कंपनीच्या सुरक्षा यंञणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे तसेच सदर कंपनीत काम करणारे कामगार यांच्या असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे  घटनेची माहिती मिळताचं सहाय्यक पोलिस निरिक्षक अर्चणा पाटील उपनिरिक्षक एटवार ,पो.काँ.तळपे,मचरे,जाधव,यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन. पंचनामा केला व पैठण  येथिल शासकीय ग्रामिण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. सदरघटनेस जबाबदार क्रेंन चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले असुन सा.पो.निरिक्षक.अर्चणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस तपास करीत आहे

Post a comment

0 Comments