फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)
फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील पोलीस स्टेशन चे सहहयक पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी सध्या सूरु असलेल्या कोरोना परिस्थिती मध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढू नये व त्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी त्यांनी पुढील प्रमाणे सर्व नागरिकांना आव्हाहन केले आहे ते पुढील प्रमाणे सर्व जनतेस याद्वारे कळविण्यात येत आहे की, सध्या कोरोणा या संसर्गजन्य रोगाचे सावट दिवसेंदिवस घट्ट होत चालले आहे. तसेच सध्या माननीय जिल्हाधिकारी साहेब औरंगाबाद यांचे जमावबंदीचा आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने शेतकरी राजाचा पोळा/पाडवा हा सण जवळ आलेला आहे.
तरी सदर सणाच्या दिवशी शेतकऱ्यांनी आपले बैलांची घरीच पूजा करावी. यावर्षी मिरवणूक कोणीही काढू नये तसेच कोणीही ही एकत्र जमा होऊ नये याची काळजी घेणे. जेणेकरून आपण व आपल्या परिवाराचे कोरोना या संसर्गजन्य रोगापासून सरंक्षण होईल व आपण या रोगापासुन दुर रहाल.
सध्या शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत तरी कुणीही धार्मिक स्थळी एकत्र येऊ नये. आपण आपल्या घरीच पोळा हा सण साजरा करावा.
सर्व शेतकरी बांधवांना पोळा/पाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
0 Comments