मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर भांगशी गडावर नराधमां चा अत्याचारऔरंगाबाद - दौलताबाद : मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका  वीसवर्षीय तरुणीच्या मित्राला मारहाण करून तरुणीवर अत्याचार केला. ही घटना औरंगाबाद शहरापासून अवघ्या सात किलोमीटरवर असलेल्या भांगसीमाता गडाच्या जंगलात मंगळवारी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी एकाही आरोपीला ताब्यात घेतले नव्हते.
 
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे राहणारी २० वर्षीय तरुणी मंगळवारी (दि.४) दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास मित्रासोबत दुचाकीवर भांगसीमाता गडावर फिरायला गेली होती. दरम्यान, गडाच्या बाजूला दोघे बसून गप्पा मारीत असताना संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले व दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तरुणीसोबत असलेल्या मित्राला जास्त मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. 

भांगशी गडावर  नराधमांच्या तरुणीवर अत्याचार औरंगाबाद - दौलताबाद : मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका  वीसवर्षीय तरुणीच्या मित्राला मारहाण करून तरुणीवर अत्याचार केला. ही घटना औरंगाबाद शहरापासून अवघ्या सात किलोमीटरवर असलेल्या भांगसीमाता गडाच्या जंगलात मंगळवारी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी एकाही आरोपीला ताब्यात घेतले नव्हते.
 
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे राहणारी २० वर्षीय तरुणी मंगळवारी (दि.४) दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास मित्रासोबत दुचाकीवर भांगसीमाता गडावर फिरायला गेली होती. दरम्यान, गडाच्या बाजूला दोघे बसून गप्पा मारीत असताना संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले व दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तरुणीसोबत असलेल्या मित्राला जास्त मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. 

तरुणाने केली आरडाओरड  
तरुणीच्या मित्राला मारहाण करून आरोपींनी तरुणीला जबरदस्ती ओढत नेले व अत्याचार केला. तरुणीला कोठे नेले याबाबत तिच्या मित्राला माहिती नव्हती. यामुळे त्याने आरडाओरड केली. 

ते नराधम तरुणीला गडाच्या बाजूला असलेल्या एका खोल खड्ड्यात घेऊन गेले. त्या नराधामांना  तरुणी वारंवार सोडून द्या, अशी विनवणी करीत होती; परंतु नराधम तिचे तोंड दाबून तिला घेऊन गेले. दोघांपैकी एक खड्ड्याच्या वर थांबून निगराणी करीत होता. दुसऱ्याने त्या पीडितेला पुन्हा मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केला, तसेच या घटनेची कुठे वाच्यता केल्यास तुला जिवे मारून टाकू, अशी धमकी देत आरोपी घटनास्थळाहून पसार झाले. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोनि. राजश्री आडे, पोलीस उपनिरीक्षक शेख आरीफ हे पुढील तपास करीत आहेत.

Post a comment

0 Comments