विजेचा शॉक लागून तरुणाचा अपघाती मृत्यू


वैजापुर(प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन

 वैजापुर तालुक्यातील बोरसर इथे शॉक लागून एक जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. पवन रामहरी जाधव, वय 22 वर्ष रा. बोरसर  हा शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान  शेतात विहिरी वरील मोटार चालू करण्यासाठी गेला असता विजेच्या धक्क्याने तो कोसळला.त्याला कुटुंबीयांनी उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.तो आई वडिलांना एकुलता एक होता,त्याच्या अकाली मृत्युने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.वैजापुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बिट जमादार मोईस बेग हे करीत आहेत.

Post a comment

0 Comments