मराठा सेवा संघ प्रणित उद्योग कक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रकाश जाधव यांची निवड...


 निलेश जांबले दौंड-पुणे
 गेली पंचवीस वर्षे मराठा सेवा संघामध्ये कार्यरत असणारे *शिवश्री प्रकाश जाधव* यांची मराठा सेवा संघ प्रणित उद्योग कक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी  नियुक्ती मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी जाहीर केली आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष  पुरूषोत्तम खेडेकर साहेब  यांच्या मार्गदर्शनाने मराठा सेवा संघाचे कार्य महाराष्ट्रसह देशभर सुरू आहे. मराठा सेवा संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत विविध कक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आली.
उद्योग व्यवसायानिमित्त देशभर कार्यरत असलेल्या मराठा बांधवांचे संघटन करणे, मराठा सेवा संघाच्या विचारांचा देशभर प्रचार-प्रसार करणे, मराठा बांधवांना उद्योग व्यवसायाचे अद्ययावत प्रशिक्षण देणे, उद्योग व्यवसायात येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यास मदत करणे, विविध कार्य मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाच्या माध्यमातून करण्यात येतात.
प्रकाश जाधव हे गेली २५ वर्षांपासून मराठा सेवा संघाचे कार्य करतात. आजवर त्यांनी मराठा सेवा संघाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष तसेच केरळ राज्याचे प्रभारी म्हणून कार्य केले आहे. तसेच प्रकाश जाधव हे  संभाजी अर्बन को-ऑप. बँकेचे माजी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा बँक असोसिएशनचे माजी संचालक व पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी संचालक आहेत. ते सध्या मोरेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे ते उपाध्यक्ष म्हणून काम पहात आहेत.मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रकाश जाधव यांच्या झालेल्या नियुक्तीबद्दल सामाजिक, सहकार क्षेत्रासह सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सरांना भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

Post a comment

0 Comments