राज्य सरकारने व पुणे महानगरपालिकेने पुण्यात योगा' क्लासला परवानगी द्यावी.. - संभाजी ब्रिगेड

निलेश जांबले
दौंड-पुणे
योगा व प्राणायाम केल्यामुळे शरीरात प्रतिकारक शक्ती वाढते व आरोग्य चांगले राहते. हास्य योगा केल्यामुळे मन प्रसन्न राहते. सहा महिने लाॕकडाऊन  काळात सर्व योगा केंद्र बंद होते. covid-19 महामारी मध्ये जगायचे असेल तर शरीराला नैसर्गिक प्रतिकारशक्ती अपेक्षित आहे. औषध गोळ्या व आयुर्वेदिक काढा पिल्यामुळे लहान मुले व जेष्ठ नागरिक यांच्या शरीरावर प्रचंड वाईट परिणाम होत आहेत. अति आयुर्वेदिक काढा पिल्यामुळे घसा जळून जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. यापासून आपले आरोग्य चांगल्या पद्धतीने जपायचे असेल तर योगा-प्राणायाम, हास्य योगा हा नियमित चालू ठेवणे गरजेचे आहे. म्हणून सर्व गार्डन खुली करून योगा केंद्र सुरू केले पाहिजेत.

लाॕकडाऊन असल्यामुळे घरात बसून सर्वांना प्रचंड नैराश्य आलेला आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार, वाद  व आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. घरात कौटुंबिक संघर्ष आणि बाहेर covid-19 चे भयानक  संकट आहे. मात्र जगण्यासाठी आता काहीतरी हालचाली केल्या पाहिजेत. अनलाॕक २- ३ सुरु झालेलं आहे. पुणे शहरात व जिल्ह्यात राज्य सरकार व पुणे महानगर पालिकेने योगा सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली पाहिजे. अशी संभाजी ब्रिगेड च्या वतीने मागणी आहे.

'औषध, गोळ्यांचा शरीरावर मुसळधार अतिरेक पडतो.' यातूनच शरीराच्या अंतर्गत वेगवेगळे आजार जन्म घेतात. यापासून सुटका मिळवायची असेल तर 'योगा - प्राणायाम' हाच योग्य पर्याय असतो. म्हणून मन प्रसन्न, आनंदी आणि शरीर निरोगी, सशक्त व सुदृढ ठेवण्यासाठी जगण्याची नवीन उमेद म्हणजे योगा होय...! 'योगा' ही शरीराची ऊर्जा होती... आज लाॕकडाऊन मुळे पुर्णतः (लाॕक झाली) आहे...!

'योगा आणि प्राणायाम' याकडे तरुणांचा व महिलांचा 'कल' जास्त आहे. जेष्ठ मंडळी तर आवर्जून येतात. विना गोळीचे बरेच आजार, दुखणे बरे होतात. आपले शरीर सुदृढ, सशक्त व निरोगी ठेवण्यासाठी पहाटे पासून दररोज 1 ते दीड तास देणारी माणसं भरपूर आहेत. तसेच भारती विद्यापीठ परिसर, तळजाई परिसर हे फिरायला जाणाऱ्यांचे व योगा आणि हास्य योगा यांचे हॉटस्पॉट स्टेशन आहेत. धनकवडी व परिसरात पुन्हा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काही सभागृह आहेत त्या ठिकाणी शेकडो लोक योगाचा फायदा घेतात. तसेच इतर खाजगी ठिकाणी ही योगा चालतात. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक त्रास, मणक्याचे आजार, गुडघ्याचा त्रास यामुळे जीवन असह्य व्हायचं. योगा व प्राणायाम मुळे आमच्या सारख्या हजारो असंख्य तरूणांना मुक्ती मिळाली. आणि काम करण्यासाठी भरपूर ऊर्जा देखील मिळाली. योगामुळे शरीराला मिळणारी ऊर्जा, लाॕक डाऊन मुळे अडकून बसली (लाॕक झाली).

कोरोना व्हायरस व लाॕकडाऊनमुळे आज सगळी योगा केंद्र व बाहेर चालत फिरणाऱ्यांची संख्या बंद झाली. सहा महिन्यापासून घरात बंद असल्यामुळे अनेक जेष्ठांना आजाराला यामुळे निमंत्रण देण्यासारखेच आहे. कदाचित तो शरीरावर अन्याय सुद्धा झालेला आहे, हे मानवी शरीराचे नुकसान देखील आहे. योगामुळे माझ्यासारखे शेकडो तरुण ठणठणीत व उत्साही झाले असले तरी आज मात्र लाॕकडाऊनमुळे घरात बसून 'योगा व प्राणायाम' करावे लागतात. लोक संपर्क तुटला. शासनाच्या सर्व अटी व शर्ती चे खडक अमोल अंमलबजावणी करून राज्य सरकारने व पुणे महानगरपालिकेने पुण्यात #योगा' क्लासला परवानगी द्यावी यासाठी गार्डन खुली करावीत. अशी मागणी संभाजी ब्रिगेड ने केली आहे

Post a comment

0 Comments