सर्व व्यापारी, फळविक्रेते यांनी कोरोना टेस्ट न केल्यास कारवाई करणार - तहसिलदार निखिल धुळधर


वैजापूर( प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन

वैजापुर शहरातील कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे,अशा परिस्थितीत सर्व व्यापारी,व्यावसायीक , किरकोळ विक्रेते , भाजीपाला व फळ विक्रेते , बॅंक कर्मचारी , शासकीय कर्मचारी यांनी कोरोना टेस्ट करून  निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे बंधनकारक करण्यात आले असून त्या अनुषंगाने आजपासुन शहरात नगरपालिका व पोलीस , महसुल प्रशासनाकडुन  सर्व व्यापारी आस्थापना , विक्रेते , त्यांचे कर्मचारी यांचेकडील कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र तपासणी मोहिम हाती घेतली असून ज्या व्यापारी , व्यावसायिक यांचेकडे प्रमाणपत्र नसेल त्यांना पहिल्या वेळी २००० रु दंड व छोटे व्यावसायिकांना ५०० रु दंड आकारण्यात येईल व त्यांनी पुढील २ दिवसात कोरोना टेस्ट न केल्यास संबंधित व्यापारी / व्यावसायिक यांना त्यांची दुकाने उघडता येणार नाहीत व या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांचेविरुद्ध साथरोग प्रतिबंध अधिनियम अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई  केली जाईल .याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निखिल धुळधर यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments