रघुवीर देशमुख यांची सामाजिक बांधलकी,एमएमए कोव्हीड सेंटरला पिपीई किट फेसशिल्ड ऑक्सीमीटर आदीची केली मदत


प्रतिनिधी सुरेश शिंदे 

रायगड 

 सोयी सुविधा अभावी रुग्णांना गमावे लागणारे जीव आणि खासगी हॉस्पिटल मधून उपचारानंतर कोरोना बाधित रुग्णांना देण्यात येणारे भरमसाठ बिल या विरोधात शिवसेनेच्या माध्यमातून सोशल मिडिया व्दारे आवाज उठवणारे शिवसैनिक रघुवीर देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी राखत महाड एमआयडीसी मध्ये उत्पादक संघा मार्फत सुरु करण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटर मध्ये महाड पोलादपूर माणगांव तालुक्यातून येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार व्हावेत या उद्देशाने या सेंटर साठी २०० पीपीई किट ४००० मास्क फेस शिल्ड थर्मामीटर ऑक्सी मीटर हँन्ड ग्लोज अशा वस्तु दिल्या आहेत 
महाडमधील शिवसैनिक रघुवीर देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी जपत एमएमए कोव्हीड केअर सेंटरसाठी दिलेल्या या आरोग्य विषयक उपकरणे व चीजवस्तु महाड पोलादपूर माणगांव चे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएम ए चे अध्यक्ष श्री संभाजी पाठारे यांचेकडे सुपूर्द करण्यात आल्या यावेळी महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार जिल्हा शल्य चिकित्सक गवळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ बिरासदार युवा सेनेचे महाड शहर अधिकारी सिध्देश पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी शिवसेनेच्या माध्यमातून रघुवीर देशमुख यांनी एमएम ए कोव्हीड सेंटर साठी उचललेल्या खारीच्या वाट्याचे आ गोगावले यांनी कौतुक करीत प्रत्येक शिवसैनिकाने देशमुख यांचा आदर्श घेत या महामारीच्या काळात आपले योगदान देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले

Post a comment

0 Comments