वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) :
लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या सुवर्ण महोत्सवी जन्मशताब्दीनिमित्त ३१ ऑगस्ट पर्यंत लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांचा
पूर्णकृत पुतळा बसवणे व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास नियोजित जागेवर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणे हटवून वॉल कंपाऊंड करून झाडे लावून सुशोभीकरण करण्या बाबत नगर परिषद मुख्यधिकारी बी यु बिघोत यांना निवेदन दिले आहे या निवेदनात येवला रोड वैजापूर येथील नियोजित जागेवर लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा प्रस्ताव आपण मंजूर करून इतका प्रदीर्घ कालावधीलोटला तरी पुतळा अद्याप पर्यंत बसविला नसून त्याबाबत कोणतीही हालचाल केली नाही या संघटनेने आपनास यापूर्वीच निवेदन दिलेले आहेत परंतु पुनश्च कोणतीही कारवाई होत नसल्याने समाजामध्ये आपणा प्रति प्रचंड असंतोष घुसमत आहे तथापी या निवेदनाद्वारे लक्ष महत्त्वपूर्ण बाबीकडे वेधण्यात येते की सदर नियोजित पुतळ्याच्या जागेवर अतिक्रमण झालेले आहे सदर हे अतिक्रमण काढले गेले नाही तर उर्वरीत समाज याचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होण्याची शक्यता आहे
करिता आपणास विनंती करण्यात येते की ३१ ऑगस्ट पर्यंत सदर ठिकाणी झालेले अतिक्रमण तात्काळ काढून सदर जागेस वॉल कंपाऊंड करुन झाडे लावून सुशोभित करण करण्यात यावे. व लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा नसता संघटनेच्या वतीने दिनांक १ सप्टेंबर पासून आपल्या कार्याल्या समोर आमरण उपोषण करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे या निवेदनावर शिवा थोरात, रुद्रा शेजवळ, ऋषिकेश त्रिभुवन, विकास सोळसे, राहुल साळवे, किरण पवार, योगेश थोरात, दीपक त्रिभुवन,सुनील त्रिभुवन,राजू अवचिते, बाळा पवार, आदीच्या स्वाक्षरी आहेत.
0 Comments