लाकडाची तस्करी करणारा ट्रक पकडला.संबंधित विभागाचे अधिकारी तडजोड करत असल्याचा ग्रामस्थां चा दावावैजापूर( प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) 

वैजापूर तालुक्यातील तलवाडा गावाजवळ दि.11 मंगळवार रोजी रात्री लाकडाची तस्करी करणारा ट्रक पकडला .वनपरिक्षेत्र  अधिकारी तडजोड करून ट्रक सोडून देणार होते. मात्र ग्रामस्थांसह गावातील तरुण घटनास्थळी आल्यामुळे त्यांना कारवाई करावी लागली. असा दावा छावा संघटनेचे किशोर मगर यांनी केला आहे.
    लाकडाची चोरटी वाहतूक करणारा ट्रक औरंगाबादकडून मालेगाव कडे जात असल्याची माहिती वैजापूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एन.आमले यांना मिळाली.त्यानुसार सापळा रचून  तलवाडा गावाजवळ  ट्रक क्रमांक एम. एच.18 .बी.जी. 77 17  या वाहानाची चौकशीअंती ट्रकमधून लाकडाची तस्करी करण्यात येत असल्याचे स्पष्ट होताच मुद्देमाल जप्त करून तहसील कार्यालयाचे कर्मचारी सोमनाथ मगर यांच्या ताब्यात देण्यात आला. सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी आदींनी ही कारवाई केली.
   घटनास्थळी तलवाडा ग्रामस्थ छावा संघटनेचे अध्यक्ष किशोर मगर ,गणेश मगर, मणेश मगर, गोरख मगर व त्यांचे सहकारी हजर झाले. वनविभागाचे कर्मचारी तसेच गावातील तरूण यांच्यात कारवाईवरून शाब्दिक बाचाबाची झाली.  त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला.चालक व अधिकारी तडजोडीची चर्चा सुरू झाली होती. आम्ही त्या ठिकाणी कारवाईची मागणी केली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो नसतो. तर संबंधित लाकडाने भरलेला ट्रक सोडून देण्यात आला असता . असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी खाजगी वाहन घेऊन आल्याने एक वेगळी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रतिक्रिया.

आम्ही घटनास्थळी जाऊन पंचनामा करून रितसर गुन्हा दाखल करत असतांना गावातील तरुणांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.नंतर त्यांना समजावून सांगितले तेव्हा कारवाई पुर्ण झाली.
 
एस.एन.आमले.वैजापूर (वनपरिक्षेत्र अधिकारी.)

Post a comment

0 Comments