काळ हे आपले आयुष्य क्षणोक्षणाला खात आहे.त्यामुळे सावध होऊन संत संगत धरावी..-- हभप अमोल महाराज गाडे.


वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन):

 प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात असू द्यावे किंवा क्षणोक्षणी याचा विचार करावा की आपल्याला मनुष्य जन्माचे उचित लक्ष कसे गाठता येईल, हा भावसागर कसा पार करता येईल, ह्या मायाजालातून कसे बाहेर पडता येईल,कारण ते म्हणतात ज्या जोरावर तुम्ही हे आयुष्य आणि त्यापायी येणारे सुख भोगत आहात तो देह हा नाशिवंत असून कधीनाकधी तो पडणार, त्यामुळे आपण सर्वानी सावध राहावे कारण काळ हे तुमचे आयुष्य क्षणोक्षणाला खात असुन आपण मृत्यूच्या जबड्यात जात असल्याचा उपदेश -- हभप अमोल महाराज गाडे ढोकनांदुरकर, यांनी केला ते खंडाळा येथील माजी उपसरपंच राजेंद्र मगर व ग्रामपंचायत सदस्य विजय मगर यांचे वडील जेष्ठ नागरिक काशिनाथ गोदाजी मगर यांच्या दशक्रिया निमित्त आयोजित किर्तणात बोलत होते .
संत तुकाराम महाराजांचा 

क्षणक्षणा हाचि करावा विचार । तरावया पार भवसिंधु ।।

नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ।।

संतसमागमी धरावी आवडी । करावी तातडी परमार्थी ।।

तुका म्हणे इहलोकीच्या वेव्हारे । नये डोळे धुरे भरुनि राहो ।।

या अभंगाचे विवेचन करताना महाराज पुढे म्हणाले की,प्रत्येकाने जमेल तसा सत्संग करावा,संतांच्या सानिध्यात राहावे किंबहुना त्याची आवडच निर्माण होईल हे पाहावे व जेवढे होईल तेवढे परमार्थमार्गात तातडीने पुढे जाण्याचे प्रयत्न करावेत. तुकोबाराय शेवटी म्हणतात की हे आयुष्य क्षणभंगुर आहे, त्यावर आंधळेपणाने विसंबून राहिल्यास घात होऊ शकतो त्यामुळे ते म्हणतात येथे ह्या इहलोकात, मृत्युलोकात व्यवहार करताना नेहमी डोळे उघडे ठेवावेत, मिळालेल्या नाम आणि लौकिकाच्या धुराने डोळे नेहमी भरूनच राहतील हे होणार नाही हे पाहावे.असेही महाराज म्हणाले.खंडाळा येथील मगर वस्ती येथे सोशल डिस्टन पाळत मास्क वापरत अगदी मोजक्या लोकांत दशक्रिया विधी पार पडला.

Post a comment

0 Comments