कल्याण पूर्वेतील गणेश विद्यमंदिर शाळेचा १०० टक्के निकाल


कल्याण - कल्याण पूर्व मधील गणेशवाडी स्थित नागरिक सेवा मंडळ संचालित गणेश विद्यामंदिर या शाळेचा यंदाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.शाळेतून  प्रथम येण्याचा मान खुशबू सतीश गावडे या विद्यार्थीनीने ९५.००% गुण मिळवून प्राप्त केला आहे तर समृद्धी मुढे ९३.००% व हर्ष जाधव ९२.४० % गुण मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.

शाळेतील सायली खोत,अजिंक्य पाटील,वल्लभ चव्हाण, सायली कांबळे,निकिता क्षीरसागर,तेजश्री पाटील, नंदिनी जाधव,सिद्धी उतेकर,तेजश्री लांडगे,ओंकार पवार व किरण पांडे आदी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

शाळेचा निकाल १०० % लागल्याने कल्याण परिसरात नागरिक सेवा मंडळ संचालित गणेश विद्यामंदिर या शाळेचे शिक्षक समितीप्रमुख शिवदास विसावे,अध्यक्ष बी.पी.बोरसे,चिटणीस नितीन पवार,खजिनदार राजेंद्र बर्वे,कुलदीप यादगिरे,योगेश आहेर,चंद्रशेखर चौधरी व सर्व शिक्षकवृंद यांचे सर्वत्र कौतुक होत असून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

शाळेतील दहावीच्या निकालाची १००% असलेली यशस्वी परंपरा यापुढेही अशीच सुरू राहील असा गाढ विश्वास संचालकानी व्यक्त केला असल्याचे शिक्षिका ललिता मोरे यांनी सांगितले आहे.

Post a comment

0 Comments