कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील आग तांडवासं एक वर्ष पूर्ण..


निलेश जांबले
 दौंड-पुणे 
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अल्कली अमाईन्स कंपनी मध्ये लागलेल्या आगीस  एक वर्ष पूर्ण झाले असून, परिसरामध्ये आजही या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण होते आहे.
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहती नजीकच्या पांढरेवाडी, कुरकुंभ ,वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी भागवतवाडी, लिंगाळी, जिरेगाव, कौठडी परिसरातील लोकांना या घटनेच्या आठवणीने आजही थरकाप उडतो... गतवर्षी झालेल्या दुर्घटने वेळी स्थानिक नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी हलविण्याच्या आदेश दिले होते त्यामुळे  येथील स्थानिकांन समोर ही औद्योगिक वसाहत मोठा  प्रश्न निर्माण झाली आहे.  औद्योगिक वसाहतीमध्ये मध्ये वारंवार होणारे अपघात स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत असून कित्येक कुटुंबासह स्थानिक नागरिकांना या औद्योगिक वसाहतीचा फटका सहन करावा लागत आहे. यापूर्वीही कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक छोटे-मोठे अपघात होऊन कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 
हा अपघात झाल्यानंतर संबंधित कंपनीवर उत्पन्न थांबवण्याचे व कंपनी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.  त्यानंतर काही दिवसात कंपनी पूर्वरत सुरू झालीमात्र निष्क्रिय प्रशासन पूर्णपणे गाफील असा कारभार करत असल्यामुळे याच औद्योगिक वसाहतीमध्ये वर्षभरात अनेक मोठे अपघात घडले  या अपघावरून स्पष्ट होत आहे...
या घटनेनंतर तत्कालीन मंत्री संजय भेगडे,खासदार सुप्रिया सुळे,आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन स्थानिकांना बळ देण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती जैसे थे राहिली यावरुन इथेही ही राजकीय मंडळी व अधिकारी यांचा आर्थिक गौडबंगाल आहे की काय अशी चर्चा आजही सुरू आहेत....

Post a comment

0 Comments