तांबडी प्रकरणातील पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यास सर्वतोपरी प्रयत्न करणार:विनायक मेटेप्रतिनिधी:रिजवान मुकादम 

रायगड

रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील तांबडी येथे ऐका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज दिनांक (१९आँगस्ट )रोजी शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची सात्वनपर भेट घेतली. 
 
त्यांच्या समवेत शिवसंग्राम रायगड जिल्ह्या अध्यक्ष -अविनाश सावंत, जिल्हा सरचिटणीस -अनंत देशमुख, प्रदेश सचिव -सत्यवान राऊत,उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष -मनोज घोसाळकर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष- आप्पा सत्ते, मुंबई महिला अध्यक्ष -अनुश्री माळगावकर,संघटक- ऐश्वर्या राणे, पांडुरंग मालुसरे, राम जगदाळे, सकल मराठा समाज रोहा तालुका अध्यक्ष प्रदीप उर्फ आप्पा देशमुख, रोहा मराठा समाजाचे नेते नितीन परब,आणी इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पत्रकार परिषदेत मेटे यांनी सांगितले की, तांबडी मध्ये घडलेली घटना ह्रदय हेलावणारी आहे. माणुसकीला काळिमा फासणारे असे कृत्य नराधमांनी केले आहेत. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवुन देण्यासाठी  सर्वतोपरी प्रयत्न करणार असुन पोलिसांनी व संबधीत चौकशी अधिकार्‍यांनी सखोल व निपक्षपाती चौकशी करून कलम ३०२,मोक्का सारखे जास्तीत जास्त कलमे लावुन सदर खटल्यासाठी सरकारी वकील अँड.उज्वल निकम यांची सरकारने नियुक्ती करुन जलद गती न्यायालयात चालवून सदर आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावून त्यांची अंमलबजावणी सरकारने लवकरात लवकर करावी कि जणू करून त्या पीडित मुलीला श्रध्दांजली मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post a comment

0 Comments