राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट च्या वतीने, कोकणातील १६ महाविद्यालयांना १०० संगणक वाटप


रायगड, गोरेगाव
(रिजवान मुकादम)
शनिवार ८ ऑगस्ट रोजी माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित दोशी वकील महाविद्यालय गोरेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट आयोजित नवा सामाजिक उपक्रम सोहळ्यात कोकणातील निसर्ग चक्रीवादळ बाधित १६ महाविद्यालयाना एकूण १०० डेस्कटॉप संगणक स्वरूप मदद देण्यात आली. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांची प्रमुख उपस्तिथी होती. तसेच रायगड चे खासदार सुनीलजी तटकरे, रायगड जिल्हा पालकमंत्री आदीतीताई तटकरे, आमदार अनिकेतजी तटकरे , राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, गोरेगाव सरपंच जुबेरभाई अब्बासी, माजी सभापती माणगाव सुभाष केकाने , अलीभाई कौचाली, कॉलेजचे चेअरमन दिलीप भाई शेट राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व मान्यवर  आवर्जून उपस्थित होते.  त्यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, 
  खासदार सुप्रिया सुळेंनी व्यासपीठावरून जवळपस १० लाख विद्यार्त्यांचा प्रश्न असल्याने केंद व राज्य सरकारला दहा तारखेला सोक्ष मोक्ष लावण्याची विनंती केली तर खासदार सुनील तटकरे यांने ७ ते८ वर्षांपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निकालात कोकणाने बाजी मारली आहे याचे अभिमान व्यक्त केले. 
 
प्रतिनिधी
रिजवान मुकादम सह मराठा तेज ब्युरो

Post a comment

0 Comments